पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'CAB' विरोधात मुंबईत आसामी नागरिकांचे आंदोलन

आसामी नागरिकांचे आंदोलन

नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात आसाममध्ये जोरदार आंदोलन सुरु आहे. याचे पडसाद मुंबईत देखील पहायला मिळत आहे. मुंबईमध्ये राहणाऱ्या आसामी नागरिकांनी या विधेयकाविरोधात आझाद मैदानावर आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने आसामी नागरिक सहभागी झाले आहेत. तसंच, प्रसिध्द अभिनेत्री दीपानिता शर्मा देखील या आंदोलनात सहभागी झाली आहे. आंदोलनामुळे आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

'फडणवीसांच्या कोणत्याही वक्तव्याकडे आम्ही गांभिर्याने पाहत नाही'

'नागरिकत्व सुधारणा विधेयक मागे घ्या आणि आसमला वाचवा', अशा आशयाचे पोस्टर्स घेऊन हे नागरिक आंदोलनाला बसले आहेत. आंदोलनकर्त्यांचे असे म्हणणे आहे की, आसामची ओळख जवळपास २०० जमाती आणि ३३ पोटभाषा अशी आहे. मात्र हे विधेयक आसामची ही ओळख संपवू शकते. भाजप सरकार वोटबँकसाठी हे पाऊल उचलत आहे. आसामी लोकांचे हक्क हिरावून घेण्याचे काम सुरु आहे.', असा आरोप या नागरिकांनी केला आहे. 

दिल्लीमध्ये आज काँग्रेसची 'भारत बचाओ रॅली

नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात ईशान्य भारतामध्ये जोरदार आंदोलन सुरु आहे. पश्चिम बंगालमध्ये सुध्दा या विधेयकाविरोधात आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान, विधेयकाच्या विरोधात आसाममध्ये गुरुवारी आंदोलन चिघळले. गुवाहटी येथे आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये तिघांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात ईशान्य भारतात सर्वत्र असंतोषाचे वातावरण आहे. गुवाहाटीमध्ये आंदोलन पाहता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. 

पालघर ४.८ रिश्टर स्केल भूकंपाच्या धक्क्याने हादरले