पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अंधेरीमध्ये पेनिन्सुला इमारतीच्या सहाव्या मजल्यावर भीषण आग

अंधेरीमध्ये इमारतीला आग

मुंबईतील अंधेरी भागामध्ये व्यवसायिक इमारतीला भीषण आग लागली आहे. अंधेरी पश्चिमेला वीरा देसाई रोडवर ही घटना घडली आहे. २२ मजली पेनिन्सुला या व्यवसायिक इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीच्या ११ व्या मजल्यावर अडकलेल्या तीन जणांची सुखरुप सुटका केली आहे. आगीचे नेमके कारण अस्पष्ट आहे.