पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊनमुळे मुंबईच्या रस्त्यांवर मोरांचा नाच!

मुंबईच्या रस्त्यावर मोर

लॉकडाऊनमुळे निसर्गात अनेक सकारात्मक बदल दिसू लागले आहेत. मुंबई शहरात उद्योग- धंदे कारखाने बंद आहेत, रस्त्यावर वाहने नाहीत त्यामुळे प्रदूषणात कमालीची घट झाली आहे. हा वसंतचा महिना आहे, झाडांवर कोवळी पालवी दिसू लागली आहे. अनेक फुलं फुलली आहेत, पक्षांचा वीणीचा हंगाम सुरु झाला आहे. एरव्ही कानावर पडणारे कर्णकर्कश आवाज गेल्या काही दिवसांत कानावर पडले नाही त्याऐवजी मंजुळ आवाजानं मुंबईकरांची सकाळ उजाडत आहे. 

धक्कादायक! औषध फवारणीसाठी गेलेल्या पालिका कर्मचाऱ्यांनाच मारहाण

एरव्ही मुंबईच्या गर्दीत मुंगीलाही शिरायला जागा नाही असं म्हणतात, अशा या मुंबईत गेल्या काही दिवसांपूर्वी एक वेगळंच चित्र दिसू लागलं आहे. मुंबईतील वाळकेश्वर, बाबुलनाथ परिसरात सकाळच्यावेळी रस्त्यावर मोर- लांडोरांचा मुक्त संचार दिसून आला आहे. मुंबईच्या मोकळ्या रस्त्यांवरून मानवी वस्तीत हे मोर फिरताना दिसत आहेत. 

याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगेलच व्हायरल होत आहेत. अभिनेत्री  जुही चावलानंही याचा व्हिडिओ शेअर केला होता. 

... आणि कोरोना प्रतिबंधक प्रोटेक्टिव्ह सूट्सचे उत्पादन देशात झाले सुरू