पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येपूर्वीच्या पत्रातून पुढे आली धक्कादायक माहिती!

डॉ. पायल तडवी

नायर रुग्णालयातील पदव्युत्तर शाखेचे शिक्षण घेणारी डॉ. पायल तडवी हिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रातून धक्कादायक माहिती हाती आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी १२०० पानांचे आरोपपत्र दाखल केल्यानंतर आत्महत्येपूर्वी लिहिलेले पत्रही पोलिसांनी सार्वजनिक केले. आरोपींकडून पायलचा मानसिक छळ केला जात होता, हे या पत्रातून स्पष्ट झाले आहे.

एकूण तीन पानी पत्रामध्ये या प्रकरणातील आरोपी हेमा आहुजा, भक्ती मेहेर आणि अंकिता खंडेलवाल यांची नावे आहेत. या तिन्ही आरोपीच पायलच्या आत्महत्येला कारणीभूत आहेत आणि आत्महत्येपूर्वी तिने केलेले हे निवेदनच आहे, असे पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्रामध्ये म्हटले आहे.

कर्नाटकात पुन्हा भाजपची सत्ता, येडियुरप्पा यांचा आजच शपथविधी

पायलच्या पत्रामध्ये स्पष्टपणे, आज माझ्यावर आणि माझी सहकारीवर (स्नेहल शिंदे) जी वेळ ओढवली आहे. त्याला सर्वस्वी हेमा आहुजा, भक्ती मेहेर आणि अंकिता खंडेलवाल याच जबाबदार आहेत, असे लिहिले आहे. पायलने २२ मे रोजी तिच्या खोलीमध्ये आत्महत्या केली होती. जातीय विद्वेषातून तिन्ही आरोपींकडून पायलवर सातत्याने अत्याचार करण्यात आले. त्यामुळेच शेवटी तिने आत्महत्या केली, असे पोलिसांच्या आरोपपत्रात म्हटले आहे. 

आपल्या आई-वडिलांना उद्देशून लिहिलेल्या पत्रामध्ये पायलने म्हटले आहे की, माझा जो छळ सुरू आहे. त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग मला दिसत नाहीये. माझ्या विभागाकडूनही यावर काही मार्ग काढला जात नाही. एका मोठ्या संस्थेत प्रवेश घेतल्यावर चांगलं शिकायला मिळेल, म्हणून मी या महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. पण इथे आल्यावर लोकांनी त्यांचे रंग दाखवायला सुरुवात केली. सुरुवातीला मी आणि स्नेहल याबद्दल कोणालाच काही बोललो नाही. पण आमचा सुरू असलेला छळ अशा पातळीवर पोहोचला की आम्हाला सहन करणे अवघड झाले. मग आम्ही त्यांच्याविरुद्ध तक्रार केली. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही, असे या पत्रात म्हटले आहे.

प्राथमिक शाळा प्रवेशाच्या वयोमर्यादेत राज्य सरकारकडून मोठा बदल

महाविद्यालयात घडणाऱ्या घटनांमुळे माझे वैयक्तिक आयुष्य, व्यावसायिक आयुष्य संपल्यात जमा आहे. त्यांनी (आरोपींनी) असे ठरवूनच टाकले आहे की जोपर्यंत त्या या महाविद्यालयात आहेत, तोपर्यंत त्या मला काहीच करू देणार नाही, असेही पायलने या पत्रामध्ये लिहिले आहे.