पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पायल तडवी आत्महत्या; आरोपींच्या जामिनावरील सुनावणी 9 ऑगस्टपर्यंत स्थगित

डॉ. पायल तडवी आत्महत्या

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टरांच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान न्यायालयाने मुख्य साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यास दिरंगाई केल्यामुळे राज्य सरकारला सवाल केले आहेत. सरकारी वकिलाने पुढील सुनावणीपूर्वी जबाब नोंदवला जाईल असे आश्वासन न्यायालयाला दिले आहे. दरम्यान, न्यायालयाने आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणी स्थगित केली असून पुढील सुनावणी 9 ऑगस्टला होणार आहे.

... हा तर सत्तेचा गैरवापर, राहुल गांधींची कलम ३७० वरून सरकारवर टीका

या सुनावणी दरम्यान, डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी प्रसारमाध्यमांच्या वार्तांकनावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी सरकारी पक्षाने न्यायालयाकडे केली. सरकारी पक्षाच्या या मागणीला डॉक्टरांच्या वकिलांनी देखील पाठिंबा दिला आहे. मात्र न्यायालयाने सरकारी पक्षाची ही मागणी फेटाळली आहे. अशाप्रकारे प्रसार माध्यमांवर बंधन घालणे योग्य नाही. दरम्यान 'अशाच एका प्रकरणात न्यायालयाने सत्र न्यायालयाचा असाच एक आदेश रद्द केला होता.', असे मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले आहे. 

उत्तराखंडमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये 16 जणांचा 

दरम्यान, याप्रकरणातील तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांचा जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. मात्र न्यायालयाने सुनावणी 9 ऑगस्टपर्यंत स्थगित केली आहे. याआधी 30 जुलै रोजी न्यायालयाने सुनावणी स्थगित केली होती. हेमा आहुजा, भक्ती मेहेर आणि अंकिता खंडेलवाल या तीन आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी १२०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.

कलम ३७० : अनेक चित्रपटांचं चित्रीकरण रखडलं