पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: आरोपपत्र मुंबई सत्र न्यायालयात सादर

डॉ. पायल तडवी आत्महत्या

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचेआरोप पत्र सादर करण्यात आले आहे. तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांच्याविरोधात आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. या आरोपपत्रामध्ये डॉ. पायल तडवीला आत्महत्येचा प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, आज डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तिन्ही आरोपी महिला डॉक्टर यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. मात्र न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी २५ जुलैपर्यंत तहकूब केली. आरोपी महिला डॉक्टरांच्या जामीन अर्जाला सराकारी वकिलांनी विरोध कायम ठेवला असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली. 

पंतप्रधानांनी ट्रम्प यांना विनंती केली नाही, जयशंकर यांचे स्पष्टीकरण

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणामध्ये सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांचे नाव होते. दरम्यान, तिन्ही महिला डॉक्टरांकडे सुसाईड नोटसंदर्भातील चौकशीसाठी न्यायालयाने पोलिसांना दिलेली मुदत १२ जुलै रोजी संपली. पोलिसांनी सलग ५ दिवस तुरुंगात जाऊन या आरोपी महिला डॉक्टरांची कॅमेऱ्यासमोर चौकशी केली. या चौकशी दरम्यान आरोपी महिला डॉक्टरांनी काहीच समाधानकारक उत्तरं दिली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी या गुन्हातील तपास थांबवला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचे आरोपपत्र तयार करण्याचे काम हाती घेतले होते.

महाजनादेश यात्रेचा प्रारंभ अमित शहा; तर समारोप पंतप्रधान मोदी करणार

दरम्यान, आज उच्च न्यायालयात या प्रकरणातील तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांच्या जामीन अर्जावर सुनावणी होती. मात्र ही सुनावणी न्यायालयाने २५ जुलैपर्यंत तहकूब केली आहे. या सुनावणी दरम्यान आरोपपत्र तयार झाले आहे. आज किंवा उद्यापर्यंत हे आरोपपत्र सत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई क्राईम ब्रँचने उच्च न्यायालयामध्ये दिली आहे. त्यानुसार मुंबई क्राईम ब्रँचने हे आरोपपत्र आजच सत्र न्यायालयात सादर केले. 

चार आठवड्यांचा वेळ द्या, कर्नाटकातील बंडखोर आमदारांचे