पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण; तिन्ही आरोपींना जामीन मंजूर

 डॉ. पायल तडवी

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आज या प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. त्यादरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने तिन्ही आरोपी डॉक्टरांना जामीन मंजूर केला आहे. 2 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर आरोपींना जामीन देण्यात आला आहे. तसंच आरोपींना एक दिवसाआड गुन्हे शाखेमध्ये हजेरी लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. 

सांगलीतील पूरस्थिती जैसे थे, नौदलाची १२ पथके बचावकार्यासाठी 

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील हेमा आहुजा, भक्ती मेहेर आणि अंकिता खंडेलवाल या तीन्ही आरोपींना जामीन देण्यात आला आहे. दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने त्यांची सुटका केली आहे. दरम्यान, जामीन देताना आरोपींना न्यायालयाने मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली आहे. नायर रुग्णालय आणि आग्रीपाडा परिसरामध्ये जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसंच त्यांना गुन्हे शाखेत हजेरी लावण्याची सक्ती न्यायालयाने केली आहे. 

पंचगंगेच्या पाणी पातळीत घट, पण कोल्हापुरात पूरस्थिती 

पायल तडवी आत्महत्या प्रकरणात तिन्ही आरोपींना 29 मे रोजी पोलिसांनी अटक केली होती. आरोपी डॉ. पायल तडवीचा छळ करायच्या, जातीवाचक टीपण्णी करायच्या. या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली होती. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. अटकेनंतर आरोपींनी जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी १२०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.