पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धक्कादायक: भांडणातून चालत्या लोकलमधून प्रवाशाला फेकले

मुंबई लोकल

मुंबईमध्ये एका प्रवाशाला लोकलमधून बाहेर फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सकाळी गर्दीच्या वेळेत झालेल्या भांडणातून सहप्रवाशाला लोकलबाहेर फेकले. हार्बर मार्गावरील टिळकनगर ते कुर्ला स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

'शबरीमला प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल म्हणजे अंतिम शब्द नाही'

विजय गुप्ता असे लोकलमधून फेकून दिलेल्या प्रवाशाचे नाव आहे. विजय गुप्ता हे मानखुर्द येथे राहतात. ते मस्जिद बंदर येथे प्रिंटिंग प्रेसमध्ये नोकरी करतात. ते नेहमीप्रमाणे कामासाठी निघाले होते. मानखुर्द स्थानकावर सकाळी ९ वाजता वाशी- सीएसएमटी लोकल त्यांनी पकडली. या लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. दरम्यान, तीन प्रवासी आणि विजय गुप्ता यांच्यात बसण्यावरुन भांडण झाले. या रागाच्या भरात या तीन प्रवाशांनी विजय गुप्ता यांना धावत्या लोकलमधून फेकून दिले.  

अर्थव्यवस्थेवर सरकारची भूमिका दिशाहीन: चिदंबरम

या घटनेमध्ये विजय गुप्ता हे गंभीर जखमी झाले आहेत. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या भांडणाचे नेमके कारण समोर आले नाही. या प्रकरणी वडाळा रेल्वे पोलिसांनी तीन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे. 

पीएनबी घोटाळा: नीरव मोदी फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित