पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईतील बेस्टच्या डेपोंमध्ये भूमिगत पार्किंग सुविधा? नवा प्रस्ताव

बेस्ट डेपो

मुंबईतील पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी भाजपच्या नगरसेविका सुरेखा पाटील यांनी नवा प्रस्ताव दिला आहे. मुंबईतील बेस्टच्या २५ डेपोंमध्ये भूमिगत खासगी पार्किंग सुरू करता येईल, असे त्यांनी आपल्या प्रस्तावात म्हटले आहे. त्यांनी मुंबई महापालिकेच्या मुख्य सभेकडे आपला प्रस्ताव सादर केला आहे.

EVM विरोधात उठावाची विरोधकांची हाक, २१ ऑगस्टला पक्षविरहित मोर्चा

सुरेखा पाटील यांनी दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे की, मुंबईतील वाहनांची संख्या वाढत असल्याने गाड्या लावण्याचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. सध्या शहरात उपलब्ध असलेली पार्किंगची सुविधा पुरेशी नाही. गाड्या लावायला पुरेशी जागा नसल्यामुळे वाहनचालक त्यांच्या गाड्या रस्त्यावर लावतात. यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. मुंबईतील पार्किंगची जागा वाढविण्यासाठी मुंबई महापालिकेने अनेक उपाय योजले आहेत. तरीही आता बेस्टच्या डेपोंमध्ये पार्किंग करता येईल का, यावरही त्यांनी विचार करायला हवा. बेस्ट उपक्रमाच्या डेपोंमध्ये भूमिगत पार्किंग सुविधा देण्यावर काम व्हायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे.

अशा पद्धतीने डेपोंमध्ये भूमिगत पार्किंग सुविधा देता येईल का, याचा अभ्यास करून अहवाल सादर केला जावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. मुंबईत सध्या ३६ लाख वाहने आहेत. त्यापैकी ५० टक्के वाहने दुचाकी आहेत. 

EVM वर आंदोलनाऐवजी विरोधक जनतेत गेले तर सहानुभूती मिळेल - फडणवीस

२०१५ मध्ये बेस्ट प्रशासनाने डेपोतील जागा खासगी पार्किंगसाठी उपलब्ध करून दिली होती. दिवसाच्या वेळी हे पार्किंग उपलब्ध होते. पण त्याचे दर जास्त असल्यामुळे वाहनचालकांचा त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.