पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कामोठेः भरधाव कारच्या धडकेत ७ वर्षांच्या मुलासह दोघे ठार, ५ जण जखमी

अपघात (प्रतिकात्मक छायाचित्र)

पनवेल जवळील कामोठे इथे भरधाव कारने सात ते आठ जणांना धडक दिल्याची घटना रविवारी रात्री घडली. यात सात वर्षांच्या मुलासह दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. पाच जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. सार्थक चोपडे (वय ७) व वैभव गुरव (वय ३२) अशी मृतांची नावे आहेत. हा अपघात कामोठे येथील सेक्टर सहामध्ये झाला.

पुणे अपघात : जाताना जिथे सेल्फी काढला, येताना तिथेच मृत्यूने गाठले!

अधिक माहिती अशी की, सेक्टर सहामधील वर्दळीच्या रस्त्यावर अचानक एका  भरधाव कारने समोरून येणाऱ्या पादचारी, दुचाकीस्वार व स्कूल बसला धडक दिली. कारच्या धडकेत एक महिला व पुरुष रस्त्यावरच बेशुद्ध पडले. एक दुचाकीस्वार रस्त्याच्या बाजूला फेकला गेला. इतरांनाही कारने धडक दिली. जखमींना त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

कारचालकाला नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मद्यप्राशन करुन चालकाने कार चालवल्याचा संशय आहे.

लोकल अपघातात शुक्रवारी सर्वाधिक मृत्यूची नोंद, १६ जणांनी गमावले प्राण