पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'जे काही बोलायचे ते उद्या गोपीनाथ गडावर बोलेन'

पंकजा मुंडे

मला जे काही बोलायचे ते उद्या मी गोपीनाथ गडावर बोलेन, अशी प्रतिक्रिया भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे. गुरुवारी स्व. गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. त्यानिमित्त गोपीनाथ गडावर मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी पंकजा मुंडे मुंबईतून परळीकडे रवाना झाल्या आहेत.  

GST च्या टप्प्यांमध्ये लवकरच मोठा बदल; मोबाईल, रेल्वे प्रवास

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज पंकजा मुंडे यांची भेट घेतली. 'एकनाथ खडसे यांच्यासोबत कौटुंबिक विषयांवर चर्चा झाली. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला', असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. तसंच, उद्या गोपीनाथ गडावर होणाऱ्या मेळाव्याला कोण-कोण उपस्थित राहणार या प्रश्नावर पंकजा मुंडे यांनी 'जे जे आतापर्यंत गोपीनाथ गडावर आले होते ते येतील', असे सांगितले. गोपीनाथ गडावर होणाऱ्या मेळाव्यात पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

'नागरिकत्व विधेयकाला विरोध करणारे पक्ष पाकिस्तानचीच भाषा

दरम्यान, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगत आहेत. त्यातच, मंगळवारी झालेल्या भाजपच्या राज्यस्तरिय कोअर कमिटीच्या बैठकीला त्या अनुपस्थित राहिल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तब्येत ठीक नसल्याने आणि गुरुवारी गोपीनाथ गडावरील कार्यक्रमाच्या तयारीसाठी वेळ हवा असल्याने त्या बैठकीला आले नसल्याचे सांगितले जात आहे. 

गुजरात दंगल : नानावटी आयोगाच्या अहवालात नरेंद्र मोदींना क्लीन चीट