पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पालघरमध्ये १५ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त; दोघांना अटक

पालघरमध्ये अवैध मद्यसाठा जप्त

पालघरमध्ये उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. तब्बल १५ लाख २० हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. आज सकाळी दादरा नगर हवेली सीमेवरील तलासरी तालुक्यतील उधवा चेकपोस्टवर ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 

फिरोजशहा कोटला स्टेडियम आता जेटलींच्या नावाने ओळखले जाणार

इनोव्हा गाडीतून ४४ बॉक्समध्ये विदेशी मद्यसाठा मुंबईमध्ये विक्रीसाठी आणण्यात येत होता. सापळा रचून पोलिसांनी हा मद्यसाठा जप्त केला आहे. सोमवारी रात्रीपासून पोलिसांचे  पथक पालघरमध्ये कार्यरत होते. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. यांची चौकशी केली असता मुख्यसुत्रधार हा मुंबई, सुरत, गुजरातचा असल्याचे समोर आले आहे. 

PM मोदींचं कौतुक करणं शशी थरुर यांना महागात पडणार

पालघर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही दारु मुंबईमध्ये कोणासाठी नेण्यात येत होती. या प्रकरणात आणखी कोण-कोण सहभागी आहेत. यासर्व बाबीचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. दरम्यान, गेल्या दोन वर्षामध्ये ७६ वाहने आणि २९८ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

पुणे पोलिसांना मोठे यश; घरफोड्या प्रकरणी ५ जणांना अटक