पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कॅबमध्ये CAA वरील चर्चा प्रवाशाला पडली महागात, पोलिसांकडून चौकशी

बाप्पादित्य सरकार

सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसीसंदर्भात फोनवरून बोलणाऱ्या एका आंदोलक कवीला कॅबचालकाने थेट पोलिस ठाण्यात नेल्याची घटना मुंबईत घडली. बाप्पादित्य सरकार असे या आंदोलक कवीचे नाव आहे. या संदर्भात ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह वुमन्स असोसिएशनच्या कविता कृष्णन यांनी एक ट्विट केल्यावर हा प्रकार समोर आला. 

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ७०० कोटींचे अतिरिक्त वाटप, हायकोर्टात माहिती

कविता कृष्णन यांच्या ट्विटनुसार, बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास उबरच्या कॅबने बाप्पादित्य सरकार जुहूहून कुर्ल्याला निघाले होते. त्यावेळी ते आपल्या फोनवरून पलीकडच्या व्यक्तीशी सुधारित नागरिकत्व कायदा, एनआरसीसंदर्भात बोलत होते. दिल्लीतील शाहिन बागेचा मुद्दाही त्यांच्या चर्चेत होता. हे सर्व बोलणे कॅबचालक ऐकत होता. त्याने काही वेळाने एटीएममधून पैसे काढायचे आहेत, असे सांगत एके ठिकाणी गाडी थांबवली. गाडीतून उतरल्यावर तो थेट दोन पोलिस घेऊनच पुन्हा गाडीजवळ आला.

पोलिसांनी सरकार यांच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी आपण जयपूरहून आलो आहोत. मुंबईमध्ये नागरिकत्व कायद्याविरोधात जे आंदोलन सुरू आहे. तिथे आपण गेले होते, असे सरकार यांनी पोलिसांना सांगितले. 

बाप्पादित्य सरकार गाडीमध्ये कोणाशी तरी बोलताना देश जाळण्याची चर्चा करीत होते. ते डाव्या विचारांचे आहेत, असे यावेळी कॅबचालकाने पोलिसांना सांगितले. त्याचबरोबर सरकार यांचे बोलणे आपण आपल्या मोबाईलवर रेकॉर्ड केले आहे, असेही तो पोलिसांना म्हणाला. 

हिंदू महासभा नेत्याच्या हत्येप्रकरणी पत्नीसह तिघांना अटक

पोलिसांनी या प्रकरणी बाप्पादित्य सरकार आणि कॅबचालक या दोघांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. त्याचदिवशी रात्री एकच्या सुमारास चौकशीनंतर पोलिसांनी सरकार यांना सोडून दिले.