पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

MeToo : नाना पाटेकरांना दिलासा, विरोधात पुरावे नसल्याचा पोलिसांचा अहवाल

तनुश्री नाना

मी टु आरोपांमुळे गेल्या वर्षभरापासून वादाच्या भोवऱ्यात असलेल्या नाना पाटेकर यांना अखेर दिलासा मिळाला आहे. नाना पाटेकर यांच्याविरोधात कोणताही पुरावा सापडला नाही असं ओशिवरा पोलिसांनी अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाला सादर केलेल्या अहवालात म्हटलं आहे त्यामुळे आता पोलिस या प्रकरणात पुढील तपास करणार नाही.  

२०१८ मध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ता हिनं नाना पाटेकर यांच्यावर  गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान नानानं असभ्य वर्तन केलं तसेच  एका राजकीय पक्षाच्या गुंडांकरवी आपल्याला धमकावलं असा आरोप तनुश्रीनं केला होता. हे प्रकरण वर्षभरापासून चांगलच गाजतंय. ही घटना २००८ मधली होती. दहा वर्षांनतर तनुश्रीनं  एका मुलाखतीत मीटु मोहिमेबद्दल बोलताना ही घटना सांगितली होती. तेव्हापासून हे प्रकरण चर्चेत होतं. 

तनुश्रीनं नाना पाटेकर यांच्याविरोधात ऑक्टोबर २०१८ मध्ये लेखी तक्रारही केली होती. तर नानाच्या वकिलांनी तनुश्रीला अब्रुनुकसानीची नोटीसही पाठवली होती. या प्रकरणाचा तपास पोलिस करत होते.  मात्र तनुश्रीनं दाखल केलेल्या तक्रारीसंदर्भात नाना पाटेकर यांच्याविरोधात पुरावा न सापडल्याचा अहवाल पोलिसांनी न्यायालयाला दिला आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Oshiwara police submitted a B summary report to magistrate court in the complaint of Tanushree Dutta against actor Nana Patekar metoo