पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'आरे'तील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणारः उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आरे मेट्रो कारशेड विरोधात निदर्शने केलेल्या आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. रविवारी रात्री प्रसार माध्यमांना त्यांनी ही माहिती दिली.

नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच घुसखोरः काँग्रेस

युती सरकारच्या कालावधीतही शिवसेनेचा आरेतील मेट्रो कारशेडच्या बांधकामास विरोध होता. त्यावेळी पर्यावरणप्रेमींसह नागरिकांनी मोठा विरोध केला होता. निदर्शनासह जेलभरो आंदोलनही करण्यात आले होते. त्यावेळी पर्यावरणप्रेमींसह सामान्य नागरिकांवर गुन्हे दाखल झाले होते. त्यावेळी याप्रकरणी सरकारवर मोठ्याप्रमाणात टीका करण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन संपल्यानंतर आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले.

आरेमध्ये मेट्रोच्या कारशेडसाठी ४ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या अंधारात झाडे कापण्यात आली होती. त्यावेळी तातडीने अनेक पर्यावरणप्रेमींनी व स्थानिक आदिवासींनी वृक्षतोड थांबवण्याचे प्रयत्न केले होते. पहाटेपर्यंत मेट्रो कारशेड विरोधी आंदोलन सुरू होते. त्यावेळी सरकारी कामात अडथळा, बेकायदा जमाव जमविणे यांसारख्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणात २९ जणांना अटक करण्यात आली होती. 

केंद्राकडून मदत मिळावी म्हणून पंतप्रधांनाची भेट घेणारः मुख्यमंत्री

दरम्यान, आपण कोणत्याही विकास कामाच्या विरोधात नसून विकास कामांना स्थगिती दिली नाही. मेट्रोचे काम सुरू असून फक्त कारशेडच्या बांधकामास स्थगिती दिली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ordered to take back the cases filed against environmentalis during the agitation against Aarey metro car shed says cm uddhav thackeray