पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ओएनजीसी प्लँट आगीमुळे मुंबईतीस गॅस पुरवठ्यावर परिणाम

सीएनजी स्टेशन

उरणमधील ओएनजीसी प्लँटच्या एका युनिटमध्ये मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीमध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ही आग अटोक्यात आली आहे. या आगीमुळे सीएनजी गॅस आणि पीएनजी गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. महानगर गॅस कंपनीने याबाबतची माहिती दिली आहे. या आगीमुळे मुंबईतल्या वडाळा येथील एमजीएलच्या सीटी गेट स्टेशनवरील पुरवठ्यावर परिणाम झाले असल्याचे महानगर गॅस कंपनीने सांगितले आहे.

डॉक्टरांवर हल्ला केल्यास १० वर्षे शिक्षा, केंद्राकडून मसुदा तयार

सीएनजी आणि पीएनजी गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे याचा सर्वात जास्त फटका मुंबईसह नवी मुंबईतील रिक्षा, टॅक्सी वाहतुकीला बसण्याची शक्यता आहे. तर महानगर गॅस कंपनीने सांगितले की, आगीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असला तरी स्थानिक पीएनजी ग्राहकांना गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न प्राध्यान्याने केला जाईल. 

पहिले राफेल विमान याच महिन्यात भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात

तर, ओएनजीसी दुर्घटनेमुळे गॅस पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून कमी दाबाने गॅस पुरवठा केला जात आहे. त्यामुळे मुंबई आणि परिसरातील अनेक सीएनजी स्टेशन चालू शकणार नाहीत. तसंच  औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांनी पर्यायी इंधनाचा वापर करावा असा सल्ला महानगर गॅस कंपनीने दिला आहे. दरम्यान, ओएनजीसीचे कामकाज पूर्ववत सुरू झाल्यानंतर एमजीएल नेटवर्कवर नियमीत गॅस पुरवठा सुरू करण्यात येईल, असे देखील कंपनीने सांगितले आहे. 

उरण येथील ONGC प्लॅंटमध्ये भीषण आग, चौघांचा मृत्यू