पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बदलापूर एमआयडीसीत स्फोट, एकाचा मृत्यू, दोन जखमी

बदलापूर ब्लास्ट

बदलापूर परिसरातील एमआयडीसीतील कंपनीत जोरदार स्फोट झाला आहे. या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. एमआयडीसीतील काजय.रेमेडिज कंपनीतील ड्रायर युनीटमध्ये  ही घटना घडली  आहे. 

बळजबरीने समलिंगी संबंध ठेवल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, १४ जण अटकेत

बुधवारी नऊच्या सुमारास हा स्फोट झाला. दरम्यान जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आलं आहे. स्फोट झाल्यानंतर आग विझवण्यासाठी दोन अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. या स्फोटात एका कामगाराचा जागीच मृत्यूत झाला तर दोन गंभीर जखमी झाले, अशी माहिती अग्नीशमन दलाचे अधिकारी भगत सोनावणे यांनी दिली.  काही केमिकल रिअॅक्शनमुळे आग लागून स्फोट झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

राज्यात मुंबई सर्वाधिक प्रदूषित शहर, अहवालातून समोर

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:One worker died and two injured in a blast in a company in Badlapur MIDC on Wednesday morning