पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नवरा-बायकोचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

खासगी शिकवणीच्या मालकाची हत्या

नवरा बायकोचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणीची चाकूने भोकसून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. भिवंडीतील अजंठा कम्पाऊंडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. नदीम अनिस मोमीन असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी इमरान रसूल सय्यद याला अटक केली आहे. 

 

पुण्यात आरोपींना शिक्षा देण्याचे प्रमाण वाढले, खुनाच्या घटनाही वाढल्या

आरोपी इमरान आणि त्यांच्या पत्नीत गेल्या काही महिन्यांपासून रोज भांडण होत होते. इमरान त्याच्या पत्नीकडे घटस्फोटाची मागणी करत होता. या दोघांमधील वाद मिटवण्यासाठी इमरानचा मित्र नदीम त्यांच्या घरी आला होता. त्याने दोघांमधील भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र आमच्या भांडणात तू का येतो? असे म्हणत इमरानने नदीमसोबत भांडण केले. बाचाबाचीत दोघांनी एकमेकांना मारहाण सुध्दा केली.

आर्थिक मंदीचा परिणाम, मुंबईत सदनिकांच्या विक्रीत घट

याचा राग मनात ठेवत इमरानने नदीमचा काटा काढायचा ठरवला. इमरानने त्याच्या एका मित्राच्या मदतीने नदीमची हत्या केली. नदीमला अजंठा कम्पाऊंड येथे गाठून चाकूने वार करत त्याची हत्या करण्यात आली. हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी इमरानचा पाठलाग करत पकडून त्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. तर त्याचा मित्र पळून गेला. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. तर त्याच्या मित्राचा शोध सुरु आहे. 

कामगार देशोधडीला, मोदी सरकार स्वतःच्याच धुंदीत मग्नः शिवसेना