पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुलुंडमध्ये लिफ्टची दुरुस्ती करताना एकाचा मृत्यू

चिमुकलीचा मृत्यू

मुलुंडमध्ये लिफ्टची दुरुस्ती करत असताना एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुलुंड पूर्वेकडील नवघर परिसरात ही घटना घडली आहे. रिचा टॉवर या इमारतीच्या तेराव्या मजल्यावर लिफ्ट अडकली होती. लिफ्टच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना अचानक लिफ्ट सुरु झाली आणि एका टेक्निशियनचा मृत्यू झाला. तर लिफ्टमध्ये अडकलेल्या तिघांची तीन तासांनंतर सुखरुप सुटका करण्यात आली. 

'मुख्य प्रश्नांपासून लक्ष वळविण्यासाठी मोदींकडून इतर मुद्द्यांचा वापर'

संजय यादव असं मृत लिफ्ट टेक्निशियनचे नाव आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजता रिचा टॉवर इमारतीतील लिफ्ट अचानक बंद पडली. १३ व्या मजल्यावर लिफ्टच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. याच इमारतीमध्ये राहणारे दोन रहिवासी आणि लिफ्टचा एक टेक्निशियन तेराव्या मजल्यावर लिफ्टची दुरुस्ती करत होते. तर दुसरा टेक्निशियन संजय यादव लिफ्टच्या वरच्या भागात दुरुस्तीचे काम करत होता. 

लोकसभेतील नरेंद्र मोदींच्या भाषणातील पाच महत्त्वाचे मुद्दे...

यावेळी अचानक लिफ्ट सुरु झाली आणि संजय यादव लिफ्ट आणि भिंतीच्या भागामध्ये अडकला. यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत लिफ्टमध्ये अडकलेल्या तिघांची सुखरुप सुटका केली. त्यानंतर त्यांनी टेक्निशियन संजय यादवचा मृतदेह बाहेर काढला. 

शीना बोरा प्रकरण : पीटर मुखर्जींनां जामीन मंजूर