पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजपने शब्द पाळला असता तर ही वेळ आली नसती, शिवसेनेकडून पुन्हा टीका

शिवसेना

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतरही शिवसेनेकडून भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून भाजपवर टीका केली जात आहे. बुधवारीही राज्यातील राष्ट्रपती राजवटीच्या मुद्द्यावरून भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. ठरल्याप्रमाणे भाजप शब्दाला जागला असता तर परिस्थिती इतक्या थराला गेली नसती. शिवसेनेस जे ठरले आहे ते देणार नाही. भले आम्ही विरोधी बाकड्यांवर बसू हा डावपेचाचा भाग नसून, शिवसेनेस पाण्यात पाहण्याचा दुर्योधनी कावा आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.

भाजपकडून पुन्हा सत्ता स्थापनेसाठी वेगवान हालचाली

अग्रलेखात म्हटले आहे की, शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा केला. पाठिंब्याची आवश्यक पत्रे वेळेत पोहोचू शकली नाहीत. १०५ वाल्यांना अपयश आल्यावर पुढच्या पावलांना हे अडथळे येणार हे गृहीतच धरायला हवे. याचा अर्थ १०५ वाल्यांनी जल्लोष करावा असा नाही. माझा मळवट मीच पुसला, पण दुसऱ्या सौभाग्याचे वाईट झाले याचा आनंद मानणाऱ्यांची ही विकृतीच महाराष्ट्राच्या मुळावर आली आहे. 

भाजपला टाटा ट्रस्टकडून ३५६ कोटींची देणगी, वर्षभरात मिळाले ७०० कोटी

राज्य स्थापन होणे यापेक्षा राज्य स्थापन न होणे यातच काहींना आनंदाचे भरते येताना दिसत आहे. आनंद कशात मानावा, दिलेल्या शब्दास जागल्याचा आनंद मानावा की महाराष्ट्र अस्थिरतेच्या खाईत ढकलल्याचा आनंद मानावा हे ज्याचे त्याला ठरवू द्या. जनता सर्वसाक्षी आहे, असेही या अग्रलेखात म्हटले आहे.