पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊनः एमपीएससीची परीक्षा पुन्हा स्थगित

आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सध्या १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. १४ एप्रिलनंतरची परिस्थिती अजून स्पष्ट झालेली नाही. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज (मंगळवार) महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्यसेवेची पूर्व परीक्षा व महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षा कधी होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

जीवरक्षक औषधांवरील बंदी उठविल्यानंतर राहुल गांधी म्हणाले...

लॉकडाउनमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दि.२२ मार्च रोजीची राज्यसेवेची पूर्व परीक्षा २६ एप्रिलला तर महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षा १० मे रोजी घेण्याचे निश्‍चित केले होते. मात्र, मागील काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक विद्यार्थी अद्यापही पुणे, मुंबईसह अन्य जिल्ह्यांमध्ये अडकले आहेत. 

धारावीत कोरोनाबाधितांचा आकडा ७ वर; दोन नव्या रुग्णात भर

वेळापत्रक नव्याने निश्‍चित केले जाणार असून आयोगाकडून करण्यात आलेल्या बदलाची माहिती विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसद्वारे दिली जाणार आहे.