पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तेल कंपन्यांनी एअर इंडियाचा इंधन पुरवठा रोखला

एअर इंडिया

आधीच आर्थिक डबघाईमध्ये असलेल्या एअर इंडिया कंपनीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तेल कंपन्यांनी एअर इंडियाचा इंधन पुरवठा रोखला आहे. थकीत रक्कम न फेडल्यामुळे तेल कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. यामध्ये इंडियन ऑइलसह सर्वच तेल कंपन्यांचा समावेश आहे.

विधानसभेसाठी सुप्रिया सुळेंची राज्यभर 'संवाद यात्रा'

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कोची, पाटणा, पुणे, विशाखापट्टणम, रांची आणि मोहाली या सहा विमानतळावर एअर इंडियाचा इंधन पुरवठा थांबवण्यात आला आहे. गुरुवारी संध्याकाळपासून तेल कंपन्यांनी एअर इंडियाचा इंधन पुरवठा थांबवला आहे. दरम्यान, याआधी देखील थकीत रक्कम न फेडल्यामुळे तेल कंपन्यांनी ६ विमानतळावर एअर इंडियाचा इंधन पुरवठा रोखला होता.

टेरर फंडिंगः कर्जात बुडालेल्या पाकला धक्का, 'ब्लॅकलिस्ट'मध्ये समावेश

दरम्यान, एअर इंडियाने आतापर्यंत ६० कोटी रुपयांची फेड केली आहे. एअर इंडियाचे प्रवक्ते धनंजय कुमार यांनी सांगितले की, 'या मुद्द्यावर तेल वितरण कंपन्यांसोबत आमची चर्चा सुरु आहे. आर्थिक मदतीशिवाय एअर इंडिया थकित कर्जाची परतफेड करू शकणार नाही. तर, विमानसेवा प्रभावित होऊ नये यासाठी विमानामध्ये पर्यायी इंधन भरुन उड्डाण करण्यात आले आहे.'

पश्चिम बंगालमध्ये मंदिराची भिंत कोसळली; ४ जणांचा मृत्यू