महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना शासकीय बंगल्याचे वाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'वर्षा' बंगल्यावर राहणार आहेत. लवकरच ते आपले वांद्रे येथील निवासस्थान मातोश्री वरुन मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान वर्षामध्ये स्थलांतरित होणार आहेत. वर्षा निवासस्थानी एक कार्यालय आणि एक कॉन्फरन्स रुमही आहे. तेथून ते मुख्यमंत्रिपदाचे कामकाज करणार आहेत.
Official residences allotted to Maharashtra CM Uddhav Thackeray and ministers Chhagan Bhujbal, Jayant Patil and Eknath Shinde. pic.twitter.com/az99Vfn9Sv
— ANI (@ANI) December 2, 2019
'पंकजा मुंडे पक्ष बदलण्याबाबतच्या चर्चेत तथ्य नाही'
तसंच, राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे 'रामटेक' बंगल्यावर राहणार आहेत. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे 'रॉयलस्टोन' या बंगल्यावर राहणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील 'सेवासदन' या बंगल्यावर राहणार आहेत. महाराष्ट्र शासनाने पत्रक काढत बंगल्याचे वाटप केल्याचे जाहीर केले आहे.
'पंकजा मुंडे काय अनेक प्रमुख नेते शिवसेनेच्या संपर्कात'
राज्याचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी २८ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शपधविधीनंतर उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी औपचारिकरित्या आपला कार्यभार स्वीकारला.
'..ही तर महाराष्ट्राशी गद्दारी',हेगडेंच्या दाव्यानंतर राऊत संतापले