पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... आता प्रियांका चतुर्वेदींकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा, हॅशटॅगची पोलखोल

प्रियांका चतुर्वेदी आणि उद्धव ठाकरे

सध्याच्या विधानसभेची मुदत संपण्यासाठी काही तास शिल्लक असताना अद्याप भाजप आणि शिवसेनेतील सत्ता वाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यातच शिवसेनेकडून भाजपवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडली जात नाही. मुखपत्र 'सामना'मध्ये मंगळवारीच देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख मावळते मुख्यमंत्री असा करण्यात आला. तर बुधवारी लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत दाखल झालेल्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी #MaharashtraNeedsDevendra वरून परत एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. हा हॅशटॅग वापरून करण्यात आलेले बहुतांश ट्विट हे महाराष्ट्राबाहेरून करण्यात आले आहेत. हाच मुद्दा उपस्थित करून प्रियांका चतुर्वेदी यांनी त्यांच्यावर टीका केली.

IND vs BAN: दिल्लीत भारत जिंकला असता बांगलादेशने 'दंगल' केली असती

जर महाराष्ट्रातील लोकांना देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत, तर महाराष्ट्राच्या बाहेरून एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्विट का करण्यात येत आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. दिल्ली, ढाका आणि दुबईतील लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणूनही देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपरोधिक टीका करण्यात आली आहे. आपल्या ट्विटसोबत त्यांनी एक आलेखही जोडला आहे. ज्यामध्ये देशाच्या कोणत्या भागातून #MaharashtraNeedsDevendra हा हॅशटॅग वापरून किती ट्विट करण्यात आले, याची माहिती मिळते.

शिवसैनिकांनी पुण्यात पीक विमा कंपनीचे कार्यालय फोडले

शिवसेनेने गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका करण्यास सुरुवात केली आहे. सत्ता वाटपामध्ये शिवसेनेला ५० - ५० टक्के वाटा हवा आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्रीपदही अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यावे आणि पहिली संधी शिवसेनेला द्यावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. पण मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्यास भाजप कोणत्याही स्थितीत तयार नाही.