मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'वाईल्ड मुंबई' या मुंबई शहरातील नैसर्गिक वारसा दर्शवणाऱ्या चित्रफीतीसंदर्भातील शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या जैविक विविधता दर्शविणाऱ्या महापालिकेचा नव्या उपक्रमाचे कौतुक केले. वेळ घ्या पण मुंबईचं वैभव जगभरात पोहचवा, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिले.
नीरव मोदीच्या संपत्तीचा होणार लिलाव; या महागड्या वस्तूंचा समावेश
या कार्यक्रमानंतर महापालिकेतील अधिकारी आणि नगरसेवकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील शूर सरदार तानाजी मालुसरे यांच्या शार्याची गाथा सांगणारा 'तान्हाजी द अनसंग वॉरियर' हा चित्रपट दाखवण्याचे नियोजिन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देखील चित्रपटाला हजर राहणार असल्याचे वृत्त होते. यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले. वृत्तपत्रामध्ये मी आज 'तान्हाजी' हा चित्रपट पाहणार असल्याच्या बातम्या आल्या आहेत. पण मी आज हा चित्रपट पाहणार नाही. मंत्रिमंडळासोबत हा चित्रपट मी नक्की बघेन, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
'वाडिया रुग्णालयाचा निधी मिळेल, पण आंबेडकर स्मारक झालेच पाहिजे'
आज सध्याच्या घडीला चित्रपट बारीवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाची राज्यातच नव्हे तर देशभरात चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणाऱ्या अजय देवगण याच्यासोबत 'तान्हाजी द अनसंग वॉरियर' हा चित्रपट पाहणार असल्याचे बोलले जात होते. मात्र त्यांनी महापालिकेच्या अधिकारांसोबत चित्रपटासाठी उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले. महानगर पालिकेतील अधिकारी तसेच नगरसेवकांना मुंबईतील दादर येथील प्लाझा सिनेमा या चित्रपटगृहात तानाजी मालुसरे यांच्या शौर्य गाथेचा चित्रपट दाखवण्यात येणार आहे.