पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एक नवा पैसाही परत पाठवला नाही, फडणवीसांनी हेगडेंचा दावा फेटाळला

माजी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस

केंद्राचे ४० हजार कोटी परत पाठवण्यासाठीच देवेंद्र फडणवीस हे ८० तासांचे मुख्यमंत्री बनले होते, हा भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळला आहे. हे संपूर्णपणे चुकीचे आहे. हा आरोप मी नाकारतोय. अशी कोणत्याही स्वरुपाची घटना घडलेली नाही. मी एक नवा पैसाही परत पाठवलेला नाही. हे १०० टक्के धादांत खोटे असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

'..ही तर महाराष्ट्राशी गद्दारी',हेगडेंच्या दाव्यानंतर राऊत संतापले 

अनंतकुमार हेगडे यांच्या दाव्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांनी तर फडणवीसांनी महाराष्ट्राशी गद्दारी केल्याची टीका केली तर राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी यात तथ्य असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पायउतार व्हावे लागेल, असा इशाराच दिला. 

फडणवीस हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, हेगडे काय बोलले हे मला माहीत नाही. माध्यमांत जे येत आहे, ती मी पाहिले. राज्यात बुलेट ट्रेनचा जो प्रकल्प सुरु आहे. तो केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. यासाठी एक कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारची भूमिका ही फक्त जमीन संपादनाची आहे. बुलेट ट्रेन करता महाराष्ट्राला एकही पैसा मिळालेला नाही. जो पैसा येईल तो त्या कंपनीत जमा होईल.

'केंद्राचे ४० हजार कोटी वाचवण्यासाठी फडणवीस ८० तासांचे मुख्यमंत्री'

ज्यांना अकाऊंटींगची पद्धत समजते. त्यांना अशा प्रकारे काही पैसे पाठवता येत नाही हे माहिती आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री असताना मी एकही धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही. केंद्राने पैसे मागितलेला नाही आणि मागण्याचा विषयही नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

आता विरोधी पक्षनेतेपदाची प्रतिष्ठा राहावी हीच इच्छा

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:not moved 40000 crores back to centre or decision has been taken by me as cm says devendra fadnavis