पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लग्नाचे आमिष दाखवून महिलेशी शारीरिक संबंध, अटकपूर्व जामिनास कोर्टाचा नकार

परस्पर सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार नाही-कोर्ट

लग्नाचे आमिष दाखवून महिलेशी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये सत्र न्यायालयाने ३५ वर्षीय आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास नकार दिला. एका लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटवरून या प्रकरणातील महिला आणि पुरुषाची ओळख झाली होती. त्यानंतर लग्न करण्याचे सांगत आरोपीने पीडित महिलेशी शारीरिक संबंध ठेवले होते.

सिंचन घोटाळा : अजित पवार यांची आता हायकोर्टात धाव

आरोपी अमेरिकेत एका कंपनीत काम करतो. लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटच्या माध्यमातून दोघांची ओळख झाल्यावर दोघे एकमेकांच्या जास्त संपर्कात आले. आरोपीचे याआधीच एका महिलेशी लग्न झाले आहे. या महिलेशी घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असतानाच ऑगस्ट २०१८ मध्ये आरोपी भारतात आला होता. त्यावेळी पीडित महिला आणि आरोपी काही दिवस एकत्र राहिले. त्याचवेळी आरोपीने लग्न करणार असल्याचे सांगत आपल्याशी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले, असे पीडित महिलेने म्हटले आहे.

या घटनेनंतर आरोपी पुन्हा अमेरिकेला निघून गेला. त्यानंतर त्याने महिलेशी संपर्क करण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्याने लग्न करण्यासही नकार दिला. संबंधित महिलेने आपल्याशी सहमतीने शारीरिक संबंध ठेवले असल्याचा युक्तिवाद आरोपीकडून सत्र न्यायालयात करण्यात आला. त्याचवेळी तिने केलेले सर्व आरोप फेटाळण्यात आले. 

नव्या मंत्र्यांचे बंगले नूतनीकरणाचा खर्च चक्रावून टाकणारा

पीडित महिलेविरुद्ध आपण अमेरिकेत गुन्हा दाखल केला आहे. तिचे दुसऱ्या पुरुषाशी शारीरिक संबंध असताना तिने आपल्याला त्याबद्दल काहीही सांगितले नाही. तिच्या सहमतीनेच आपण तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचे आरोपीचे सांगणे आहे. पण दोघांमधील संबंध परस्पर सहमतीने होते की बळजबरीने हे सुनावणी घेतल्यानंतरच स्पष्ट होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आणि आरोपीला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला.