पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजपला घेतल्याशिवाय सरकार होऊच शकत नाही - चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील (ANI)

राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५ जागांवर विजय मिळाला आहे. १४ अपक्ष आमदारांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आम्हाला घेतल्याशिवाय राज्यात कोणतेच सरकार तयार होऊ शकत नाही, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केला. भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

चिदंबरम यांना पुन्हा झटका, जामीन अर्ज फेटाळला

ते म्हणाले, राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे सविस्तर विश्लेषण बैठकीमध्ये करण्यात आले. विधानसभा निवडणुकीत भाजपला १ कोटी ४२ लाख मते मिळाली आहेत. तर निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेला ९० लाख मते मिळाली आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला ९२ लाख मते मिळाली आहे. २०१४ मध्ये आम्ही २६० जागांवर उमेदवार दिले होते. त्यापैकी १२२ ठिकाणी आमचे उमेदवार विजयी झाले होते. यावेळी आम्ही १६४ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. त्यापैकी १०५ ठिकाणी आमचे उमेदवार विजयी झाले आहेत. याचाच अर्थ आमचा परफॉर्मन्स आणखी चांगला आहे. लढविलेल्या १६४ जागांपैकी ५९ ठिकाणी भाजपचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मगरीच्या जबड्यातून बहिणीला सोडवणाऱ्या भावाची चित्तथरारक सत्यकथा

आयात उमेदवारांवरून कायम टीका केली जाते. त्याबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, १६४ उमेदवारांपैकी २६ उमेदवारच अन्य पक्षातून आलेले होते. त्यापैकी १६ उमेदवार विजयी झाले आहेत. फक्त दहाच उमेदवार पराभूत झाले आहेत. १९९० नंतर कोणत्याच पक्षाला १०० पेक्षा जास्त जागा जिंकता आल्या नव्हत्या. पण भाजपने सलग दोन निवडणुकांमध्ये १०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. दोन्ही वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला मिळूनही १०० चा आकडा पार करता आलेला नाही, असेही त्यांनी सांगितले.