पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नितीन गडकरी मुंबईत, राजकीय हालचालींसाठी भाजपकडे खूप कमी वेळ

नितीन गडकरी

पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देणार असाल तरच आमच्याशी संपर्क साधा, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी स्पष्ट केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेत निर्माण झालेला तिढा आणखी वाढला आहे. त्यातच आज केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी मुंबईत दाखल होत आहेत. मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची आणि अन्य वरिष्ठ नेत्यांची बैठक शुक्रवारी होते आहे. या बैठकीत नितीन गडकरी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 

मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

नितीन गडकरी हे गुरुवारी दिल्लीहून नागपूरमध्ये दाखल झाले होते. विमानतळावर बोलताना राज्यातील राजकीय पेच लवकरच संपुष्टात येईल आणि भाजपचाच मुख्यमंत्री सत्तेवर येईल, असे म्हटले होते. नागपूरमध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. त्यानंतर ते शुक्रवारी सकाळी मुंबईत दाखल होत आहेत. त्यामुळे त्यांच्या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ शनिवारी, ९ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येतो आहे. त्यामुळे राजकीय हालचाली करण्यास सत्ताधारी भाजपकडे अत्यंत कमी वेळ शिल्लक राहिला आहे. जर युतीतील तिढ्यावर कोणताही तोडगा निघाला नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शनिवारी राजीनामा द्यावा लागेल. त्यानंतर राज्यपाल पुढील निर्णय घेऊ शकतात.

पंढरपूरमध्ये वारकऱ्यांच्या टेम्पोला अपघात; ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

विधानसभा निवडणुकीत १०५ जागा जिंकत भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पण सत्ता स्थापनेसाठी आवश्यक मॅजिक फिगर गाठण्यासाठी भाजपला १४५ आमदारांची गरज आहे. शिवसेना सोबत न आल्यास हा आकडा गाठणे तूर्त शक्य नाही. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर व्हावे लागणार आहे.

पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आणि सत्तेत समसमान वाटा यावर शिवसेना अद्याप ठाम आहे. तर मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्यास भाजप तयार नाही. यामुळेच तिढा निर्माण झाला आहे.