पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मनोहर जोशींनी केलेले विधान ही त्यांची वैयक्तिक भूमिका'

डॉ. नीलम गोऱ्हे

शिवसेना आणि भाजप कधीही एकत्र येतील असे वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केले होते. त्यांच्या या खळबळजनक वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, मनोहर जोशी यांनी केलेले विधान ही त्यांची वैयक्तिक भूमिका असल्याचे  शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले आहे.

शिवसेनेकडे गृह, नगरविकास; राष्ट्रवादीकडे अर्थ, गृहनिर्माण, घोषणा लवकरच

मनोहर जोशी यांच्या वक्तव्याबाबत नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, 'मनोहर जोशी यांनी केलेले वक्तव्य वैयक्तिक आहे. ही शिवसेनेची भूमिका नाही. त्यांच्या पिढीच्या मनात अशाप्रकारच्या भावना असणे हे स्वाभाविक आणि भावनिक असले तरी सुध्दा ही पक्षाची भूमिका नाही. राज्यातील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी ही महाविकास आघाडी मजबूत आहे. हे सरकार चांगल्याप्रकारे जनतेसाठी काम करत आहे. त्यामुळे मनोहर जोशींनी केलेले वक्तव्य शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचे नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले आहे. 

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत

दरम्यान, 'शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांनी एकत्र यायला हवे असे मला वाटत असल्याचे मनोहर जोशी यांनी सांगितले होते. भाजप-शिवसेना कधीही एकत्र येतील. याबाबत उद्धव ठाकरे योग्यवेळी निर्णय घेतील. छोट्या-मोठ्या गोष्टींवरुन भांडण करण्यापेक्षा काही गोष्टी सहन कराव्यात. काही गोष्टी आपल्या आग्रहाच्या असतील तर त्या सांगाव्यात. एकत्र काम केले तर दोघांच्याही फायद्याचे ठरेल, असे वक्तव्य मनोहर जोशी यांनी केले होते. 

अमेरिकेतील न्यू जर्सीत गोळीबार; पोलिस अधिकाऱ्यासह ६ जण ठार

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:nilam gorhe says manohar Joshiji statement is his personal statement and not shiv senas official stand