पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नव्या आघाडीत मुख्यमंत्री शिवसेनेचाच यावर शिक्कामोर्तब, पण...

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते एकत्रित चर्चा करताना

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांची आघाडी महाराष्ट्रात लवकरच सत्तेत येईल, असे चित्र निर्माण झाले आहे. या तिन्ही पक्षांनी आपल्या सरकारसाठी किमान समान कार्यक्रम निश्चित केला असून, मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचाच नेता विराजमान होईल, हे सुद्धा निश्चित झाले आहे. पण याबद्दल अधिकृत घोषणा झालेली नाही. तिन्ही पक्षांचे श्रेष्ठीच अंतिम निर्णय घेणार आहेत.

क्रिकेट अन् राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही घडू शकते : गडकरी

या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक गुरुवारी मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, शिवसेना आपल्या जुन्या मित्रपक्षाला सोडून आमच्यासोबत येतो आहे. मुख्यमंत्रीपद ही त्यांची प्रमुख मागणी आहे. त्यामुळे त्यांच्या मागणीचा सन्मान करणे ही आमची जबाबदारी आहे. अद्याप काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सहभागी होणार की बाहेरून पाठिंबा देणार हे निश्चित झालेले नाही. तो निर्णय येत्या काही दिवसांत अंतिम होईल.

येत्या रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट दिल्लीत घेणार आहेत. त्यानंतर सरकार स्थापनेच्या हालचालींना अधिक वेग येईल. या दोन्ही नेत्यांमधील भेटीनंतर सोनिया गांधी आणि शरद पवार हे दोघेही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीतच सर्व निर्णय घेतले जातील आणि सरकार स्थापनेवर अंतिम शिक्कामोर्तब केले जातील, असे एका नेत्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.

राज्यात पुन्हा भाजपचंच सरकार येणार: फडणवीस

दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत गुरुवारी सांगितले की भाजपशिवाय इतर कोणताच पक्ष महाराष्ट्रात सरकार स्थापन करू शकणार नाही. त्यांच्या या विधानामुळे नव्या तर्क-वितर्कांना सुरूवात झाली आहे.