पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बेस्ट प्रशासनाचा मोठा निर्णय, सहा महिन्यांत अंमलबजावणी

बेस्ट

मुंबईतील बेस्ट प्रशासनाकडून लवकरच महिला वाहनचालकांची नेमणूक करण्यात येणार आहे. बेस्टकडून वापरात आणल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक बससाठी महिला वाहनचालक नेमण्यात येतील. येत्या सहा महिन्यांत इलेक्टिक बसेस बेस्टच्या ताफ्यात समाविष्ट होणार आहेत.

भीमा-कोरेगाव तपास : सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याची राज्याकडून चाचपणी

बेस्ट समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये ३०० इलेक्ट्रिक बस ताफ्यात घेण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर यापैकी काही बसेस चालविण्यासाठी महिला वाहनचालक नेमण्यालाही मंजुरी देण्यात आली. 

मुंबईमध्ये सध्या महिलांकडून लोकलचे, मेट्रोचे, रिक्षाचे आणि टॅक्सीचे सारथ्य करण्यात येते. फक्त बेस्ट बसेसमध्ये आतापर्यंत महिला वाहनचालक नव्हत्या. राज्यात काही एसटी बसेसमध्येही महिला वाहनचालक कार्यरत आहेत. 

बेस्टकडून एकूण ४५० इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यापैकी ३४ इलेक्ट्रिक बसेस आधीच बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. आता ३०० बसेस कंत्राटी पद्धतीने बेस्टच्या ताफ्यात येतील. यामध्ये संबंधित बस आणि वाहनचालक दोन्हीही खासगी कंत्राटदारांकडून बेस्टला दिले जातील. 

इंदिरा गांधींकडूनही लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न - जितेंद्र आव्हाड

महिला सशक्तीकरणासाठी बेस्ट प्रशासनाकडून गेल्यावर्षी सहा महिला कंटक्टरची भरती करण्यात आली होती. पण नंतर या महिलांच्या मागणीनुसार त्यांची अन्य विभागात बदली करण्यात आली होती.