पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुढचे तीन दिवस मुंबईत मुसळधार; कोकण, गोव्यात होणार अतिवृष्टी

मुंबई पाऊस

पुढच्या तीन दिवसांमध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचप्रमाणे कोकण, गोव्यामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गुरुवारी मुंबई शहरासह उपनगरामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. पुढचे तीन दिवस हिच परिस्थिती कायम राहणार आहे. गुरुवारी मुंबईतील कुलाबा येथे ५२.२ तर सांताक्रुझ येथे ३८.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

Vijay Diwas : कारगिल विजय दिवसानिमित्त देशभरात कार्यक्रम

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, २६ जुलै रोजी कोकण, गोव्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे. २७ जुलै रोजी कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात देखील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. २८ जुलै रोजी कोकण, गोव्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होईल. तर मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २९ जुलै रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.  

प्राथमिक शाळा प्रवेशाच्या वयोमर्यादेत राज्य सरकारकडून मोठा बदल