पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दुसऱ्या पुरुषाशी लग्न केल्याच्या रागातून प्रियकराकडून प्रेयसीवर हल्ला

प्रातिनिधिक छायाचित्र

प्रेम करून नंतर प्रेयसीने लग्न दुसऱ्याशी केल्याच्या रागाने एका प्रियकराने विवाह झालेल्या प्रेयसीवर चाकूने हल्ला केला. दुसऱ्या पुरुषाशी लग्न केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अंबरनाथमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याचे नाव विशाल खाडे (वय १९) असे आहे. हल्ला झालेल्या विवाहित तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

'पक्षाविरुध्द कारवाई केली तर गय केली जाणार नाही'

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीने आपले विशालशी प्रेमसंबंध होत असे सांगितले. पण घरच्यांमुळे आपण त्याच्याशी लग्न केले नाही आणि दुसऱ्या तरुणाशी लग्न केले. बुधवारी या दोघांचे लग्न झाले.

गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास तरुणी सार्वजनिक शौचालयातून येत होती. त्यावेळी विशालने तिला गाठले आणि तिच्यावर चाकूने हल्ला केला. यानंतर त्याने तिच्या पतीवरही हल्ला केला.

अबब! नाताळनिमित्त प्रत्येक कर्मचाऱ्याला ३५ लाख रुपयांचा बोनस

स्थानिकांनी लगेचच तरुणीला शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिच्या नवऱ्याला किरकोळ जखमा झाल्या आहेत, असे अंबरनाथ पोलिस ठाण्याचे संजय धुमाळ यांनी सांगितले.