पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

१७ व्या मजल्यावरुन नवजात मुलीला फेकले; आईची चौकशी सुरु

कांदिवली इमारतीवरुन बाळाला फेकले

मुंबईमध्ये नवजात मुलीला १७ व्या मजल्यावरुन फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये बाळाचा मृत्यू झाला आहे. कांदिवलीच्या लालजीपाडा परिसरात गुरुवारी ही घटना घडली आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी बाळाच्या आईला ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरु आहे.

अजित पवारांना दिलेल्या क्लीन चीटशी माझा संबंध नाही - फडणवीस

कांदिवलीच्या लालजीपाडा परिसरात एसआरएच्या इमारती आहेत. यामधील जय भारत ही २१ मजली इमारत आहे. या इमारतीच्या १७ व्या मजल्यावरून बाळाला फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. इमारतीच्या डकमध्ये नवजात बाळ पडले. बाळाचा रडण्याचा आवाज येताच सुरक्षारक्षक आणि रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. 

फडणवीस सरकारचे अनेक निर्णय ठाकरे सरकारच्या स्कॅनरखाली
 
माहिती कळताच, कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीला ताब्यात घेतले जवळच्या शताब्दी रुग्णालयात तिला घेऊन गेले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. मुलीच्या शरीरावर नाळ तशीच होती त्यामुळे ती नुकतीच जन्मलेली असावी असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी त्याच इमारतीमधील रहिवाशांची चौकशी केली असता एका महिलेची नुकतीच प्रसुती झाली होती. तिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांकडून तिची चौकशी सुरु आहे.

नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या प्रती संसद सदस्यांकडे