पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मनसेच्या नव्या झेंड्याचे अनावरण, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

मनसेचा नवा झेंडा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंड्याचे गुरुवारी सकाळी पक्षाच्या राज्यव्यापी अधिवेशनात अनावरण करण्यात आले. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीला नव्या झेंड्याबद्दल माहिती दिली आणि त्यानंतर हा झेंडा पक्षाचा अधिकृत ध्वज म्हणून स्वीकारण्यात आला. नव्या भगव्या रंगाच्या झेंड्यावर शिवमुद्रा आहे. या नव्या झेंड्यामागील संकल्पना नक्की काय आहे, हे खुद्द राज ठाकरेच संध्याकाळी आपल्या भाषणामध्ये जाहीर करणार आहेत.

'उद्धव ठाकरेंच्या नियोजित अयोध्या दौऱ्याचा सरकारशी संबंध नाही'

गेल्या काही दिवसांपासून मनसेच्या नव्या झेंड्याबद्दल उत्सुकता होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी राज्यव्यापी अधिवेशन घेण्याचे राज ठाकरे यांनी गेल्या महिन्यात जाहीर केले होते. तेव्हापासून या अधिवेशनाबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. राज ठाकरे आता हिंदुत्वाच्या मार्गाने मार्गक्रमण करणार असल्याची चर्चा रंगली आहे. पण त्याबद्दल अधिकृतपणे अद्याप कोणीही बोललेले नाही. राज ठाकरे अधिवेशनात संध्याकाळी सविस्तरपणे आपली भूमिका मांडणार आहेत. 

... आता राहुल गांधी सरकारविरोधात देशव्यापी यात्रा काढणार

राज ठाकरे नवा विचार घेऊन नवीन दिशेने पुढे जाणार असल्याचे पक्षाचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी आपल्या भाषणावेळी स्पष्ट केले. दरम्यान, झेंड्यावर शिवमुद्रा वापरल्याने काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. मराठा समाजातील नेते विनोद पाटील यांनी या प्रकरणी न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले.