पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीचे विलिनीकरण नाही, या निव्वळ अफवा'

अजित पवार, जयंत पाटील, शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही. ही निव्वळ अफवा आहे. ही बातमी माध्यमांत कशी आली याबाबत आम्ही विचार करत आहोत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर माध्यमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, शनिवारी पक्षाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी यावर खुलासा केला. तत्पूर्वी, बैठकीत शरद पवार यांनीही पक्ष विलीनीकरणाची बातमी ही अफवा होती. ज्यांना वाटतं की आपण मित्रांसोबत एकत्र राहू नये अशा विचारांच्या पत्रकारांना सोबत घेऊन ही बातमी मुद्दाम पसरवली गेली. ही बातमी साफ खोटी आहे. राष्ट्रवादीचे स्वतंत्र अस्तित्व आहे आणि ते अस्तित्व कायम राहिल, असे म्हटले होते.

राहुल यांच्यासोबतच्या भेटीत विलिनीकरणावर चर्चा नाही: शरद पवार

बैठकीत अजित पवार म्हणाले की, कोणत्याही परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही. पक्षाचे स्वतःचे एक अस्तित्व आहे, हे अस्तित्व पक्ष कायम ठेवणार. कार्यकर्त्यांनी अफवांना बळी पडता कामा नये. जनता लोकसभेला वेगळा विचार करत असते आणि विधानसभेला वेगळा विचार करत असते. महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुकीत लोक वेगळा विचार करतील आणि या सरकारला खाली खेचतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पराभव हा पराभव असतो पण त्याने खचून जायचं नसते, पुन्हा लढायचं असते.

केंद्र सरकारने सुडाचे राजकारण करु नये- जयंत पाटील