नागरी उड्डाण मंत्री असताना प्रफुल्ल पटेल यांनी वैयक्तिक निर्णय घेतलेले नव्हते. मंत्री समितीने ते निर्णय घेतले होते, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच सरकारने सुडाचे राजकारण करु नये असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीची आज (शनिवार) पहिलीच बैठक झाली. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी बैठकीतील चर्चेची माहिती माध्यमांना दिली.
...म्हणून शरद पवार मोदींच्या शपथविधीला अनुपस्थित राहिले
प्रफुल्ल पटेल यांना विमान वाहतूक घोटाळ्याप्रकरणी ईडीने समन्स पाठवले असून ६ जूनला त्यांना चौकशीस बोलावले आहे. त्यावर पाटील यांनी पक्षाची भूमिका मांडली. चौकशीत पटेल हे समाधानकारक उत्तरे देतील असे त्यांनी सांगितले.
राहुल यांच्यासोबतच्या भेटीत विलिनीकरणावर चर्चा नाही: शरद पवार
बैठकीत पदाधिकाऱ्यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. ही बैठक १०० दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाली. पक्षाचे नेते राज्यभरात दौरे काढणार आहेत. या दौऱ्यात ते राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत युवकांना आणि तरुणींना उमेदवारी देण्याच्या सूचना केल्याचेही ते म्हणाले.
विमान वाहतूक घोटाळाः राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांना ईडीचे समन्स
या बैठकीत विधानसभेसाठीच्या जागा वाटपावर चर्चा झाली नाही. जागावाटपावर योग्यवेळी चर्चा करु. पण माध्यमांसमोर यावर चर्चा करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीमुळे राष्ट्रवादीला ८ ते १० जागांच फटका बसल्याचे त्यांनी सांगितले.