पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री होणार - सूत्र

अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने राष्ट्रवादीच्या सुत्रांच्या हवालाने हे वृत्त दिले आहे. उपमुख्यमंत्री पदासाठी अजित पवार आणि जयंत पाटील या दोघांची नावं चर्चेत होती. मात्र अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे सांगितले जात आहे. मात्र दुपारी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये याची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

 

महाराष्ट्रात मोदी-शहांचा डाव अपयशी ठरला: सोनिया गांधी

दरम्यान, अजित पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्री पद दिले असल्याची चर्चा असली तरी देखील अजित पवार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शपथ घेणार नाहीत. तसंच, उपमुख्यमंत्री पदावरुन अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा होती. त्यांचा फोन देखील सकाळपासून नॉट रिचेबल होता. मात्र आता आलेल्या माहितीनुसार अजित पवार हे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

अजित पवारांनी जाणीवपूर्वक फोन बंद ठेवलाय- राष्ट्रवादी

राष्ट्रवादीतून बंड केल्यामुळे अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद दिले जाणार की नाही यावर संभ्रम होता. बंडांची शिक्षा म्हणून त्यांना उपमुख्यमंत्री पद दिले जाणार नाही असे म्हटले जात होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि कार्यकर्ते यांच्याकडून अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद द्यावे अशी मागणी वाढत चालली आहे. आता उपमुख्यमंत्री पद अजित पवार यांच्याकडे जाणार की नाही हे महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेतूनच स्पष्ट होईल. 

'कितीही चौकशा करा आम्हाला काहीही फरक पडणार नाही'