पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

JNU हिंसाचार : NCP चे युवा आमदार रोहित पवारांनी विचारले संतप्त सवाल

रोहित पवार

जेएनयूमध्ये रविवारी झालेल्या हिंसाचाराचे पडसाद राज्यातही उमटल्याचे पाहायला मिळाले. ठिकठिकाणी विद्यार्थी या हल्ल्याचा निषेध करत आहेत. मुंबईतील 'गेट वे ऑफ इंडिया' येथे देखील दिल्ली विद्यापीठातील हिंसाचाराच्या घटनेच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी सोमवारी आंदोलन केले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार हे देखील सहभागी झाले होते.  शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचंच नाही का?, असा संतप्त सवाल त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केला. त्यासोबतच अनेक प्रश्नही उपस्थित केले.  

जेएनयू हिंसाचार: कुलुगुरुंना हटवण्याची मागणी

रोहित पवार म्हणाले, जेएनयूमध्ये जी घटना घडली त्यात सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी होते. शुल्कवाढीच्या मुद्यावरुन गांधीजींच्या विचाराने शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु असताना बाहेरुन काही लोक याठिकाणी आली. कोणत्याही संस्थेत प्रवेश करताना तिथे पास द्यावा लागतो, ओळख सांगावी लागते. असं असताना हे गुंड तिथे आले कसे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दोन तासाहून अधिक काळ आंदोलनादरम्यान हाणामारीचा प्रकार सुरु असताना पोलिस कोठे होते? जेएनयूत गेले दीड दोन महिने कुलगुरू दिसत नाहीत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे.  

विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा वारंवार प्रयत्न सुरु: सोनिया गांधी

विद्यार्थ्यांना वाईट पद्धतीने मारलं गेलं.  काही लोकांना शांततेनं केलेलं आंदोलन आवडत नाही का? गांधीजींच्या विचाराने शांततेत आंदोलन करणं चुकीचं आहे का? आम्ही सर्वजण रविवारच्या घटनेचा निषेध करतो. या घटनेची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली आहे. जेएनयूत रविवारी तोंडाला रुमाल बांधून काही अज्ञात घुसले. त्यांनी वस्तिगृहात घुसून विद्यार्थी आणि शिक्षकांना मारहाण केल्याचा प्रकार घडला होता.  अज्ञातांनी  कँम्पसमधील गाड्यांची देखील तोडफोड केली. जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयशी घोष यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये जेएनयूचे १८ विद्यार्थी जखमी झाले होते.