पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजप गोंधळ करणारा पक्ष आहे: रोहित पवार

रोहित पवार (ANI)

भाजपने सभात्याग करायचा हे आधीच ठरवले होते. लोकांना माहिती आहे की हे नाटक आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. तसंच, भाजप गोंधळ करणारा पक्ष आहे. गोंधळ कसा करावा हे त्यांना माहिती आहे. गेल्या ५ वर्षात त्यांनी सरकार कसे चालवले ते आपल्याला माहिती आहे. भाजपला गोंधळ आणि वाद करायचा असेल तर आम्ही नविन आमदार हे करुन देणार नाही, असे रोहित पवार यांनी सांगितले. 

फडणवीसांनी खडसेंकडे 'क्लास' लावावा: नवाब मलिक

विधानसभा कामकाजाच्या पहिल्याच दिवशी भाजपने गोंधळ घातला. मात्र त्यांच्याकडून काय शिकावे आणि काय नाही शिकावे हे आपल्यावर असते, असे रोहित पवार यांनी सांगितले. तसंच, ही प्रक्रिया शांततेत पार पडली असती. नवीन मुख्यमंत्र्यांचे, नवीन मंत्र्यांचे स्वागत न करता, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत न करता भाजपने गोंधळ घातला, असल्याचे त्यांनी सांगितले. 

छत्रपतींच्या, आई-वडिलांच्या नावानं शपथ घेणं गुन्हा नाहीः उद्धव

दरम्यान, विधानसभेचा मान ठेवणे प्रत्येक आमदाराची जबाबदारी आहे. विरोधाकडे आम्ही दुर्लक्ष करुन आमचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढच्या ५ वर्षात लोकांनी आमच्यावर टाकलेला विश्वास यासाठी आम्ही काम करत राहणार आहोत. विधानसभेत ९० आमदार नवीन आहेत. आम्ही एकत्रित राहून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

महापुरुषांबद्दल भाजपला इतकी असूया का आहे; जयंत पाटलांचा सवाल