पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चुनाभट्टी-बीकेसी पूल खुला करा; नवाब मलिकांचे आंदोलन

नवाब मलिक यांचे आंदोलन

चुनाभट्टी-बीकेसी उड्डाण पूल बांधून अनेक महिने झाले तरी सुध्दा या पुलाचे उद्घाटन करुन तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येत नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक संतप्त झाले आहे. सरकार जर या पुलाचे उद्घाटन करत नसेल तर आम्ही उद्घाटन करुन तो जनतेसाठी खुला करु, असा  नवाब मलिक यांनी इशारा दिला होता. नवाब मलिक यांनी रविवारी हा पूल वाहतुकीसाठी खुला करावा यासाठी आंदोलन केले. जेसीबीवर उभे राहून त्यांनी आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.

अमेरिकेने केलेल्या कारवाईत आयसीसचा म्होरक्या बगदादी ठार?

एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी समजुत काढल्यानंतर नवाब मलिक यांनी हे आंदोलन मागे घेतले. चुनाभट्टी - बीकेसी पूल बांधून बरेच दिवस झाले. मात्र या पुलाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री टाळाटाळ करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. पुल वाहतुकीसाठी खुला न केल्यामुळे आसपासच्या परिसरामध्ये मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

भाजपच्या नेतृत्वाखालीच राज्यात महायुतीचं सरकार काम करेल: मुख्यमंत्री

दरम्यान, उड्डाणपूल जनतेसाठी खुला करण्यासाठी केलेल आंदोलन आम्ही तात्पुरते स्थगित केले आहे. एमएमआरडीचे कमिशनर आर. ए. राजीव यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. सिग्नल यंत्रणेचे काम बाकी असल्याचे राजीव यांनी सांगितले. हे काम तत्काळ पूर्ण करा आणि ८ दिवसांच्या आत हा पूल जनतेसाठी खुला करा अन्यथा आज जेसीबी आणली होती उद्या बुलडोझर घेऊन आंदोलन करू, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला.

प्रहार जनशक्ती पक्षाचा शिवसेनेला जाहीर पाठिंबा