पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुनेचा छळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाणांविरोधात गुन्हा

राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण (छायाचित्र-फेसबुक)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या तथा आमदार विद्या चव्हाण यांच्याविरोधात सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या पाठीवर मुलगाच हवा या हट्टापायी सुनेचा छळ केल्याचा आमदार विद्या चव्हाण यांच्यावर आरोप आहे. विद्या चव्हाण आणि कुटुंबीयांविरोधात विलेपार्ले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आमदार चव्हाण यांनी हे आरोप फेटाळले आहेत. 

अमृता फडणवीस म्हणाल्या, PM मोदींचा निर्णय फॉलो करेन!

आमदार चव्हाण यांनी हे आरोप खोटे असून परस्पर सहमतीने घटस्फोट घेण्याची तयारी आपल्या मुलाने दर्शवली होती. परंतु तिने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, असे त्यांनी सांगितले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसरी मुलगी झाल्याने चव्हाण कुटुंब पीडितेचा छळ करत होते. पीडितेला आधीची मुलगी होती. त्यात दुसरीही मुलगीच झाली. मुदतीआधीच प्रसूती होऊन हे बाळ दगावले. याप्रकारानंतर घरच्यांकडून माझा अधिकच छळ होऊ लागला, असे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे. 

'दोषींना फासावर लटकवल्याशिवाय चैन पडणार नाही'

विद्या चव्हाण यांच्यासह पती अभिजित, मुलगा आनंद, त्याची पत्नी व चव्हाण यांची दुसरी सून शीतल तसेच तक्रारदार सुनेचा पती अजित यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात १६ जानेवारी रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. सूनेचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम ४९८ अ, ३५४, ३२३, ५०४, ५०६ आणि ३६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:NCP leader Vidya Chavan and her family has been booked in a case for alleged harassment of her daughter in law