पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवेंद्रसिंह राजेंचं भाजपत जाण्याचं ठरलं, आमदारकीचा दिला राजीनामा

शिवेंद्रसिंह राजे भोसले

साताऱ्यातील जावळी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्रसिंह राजे यांनी अखेर आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा मंगळवारी सकाळी सुपूर्द केला. रविवारीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवेंद्रसिंह राजे हे कुठेच जाणार नसून ते राष्ट्रवादीसोबत राहणार असल्याचा दावा केला होता. पण दोनच दिवसात शिवेंद्रसिंह राजे यांनी शरद पवार यांचा दावा खोटा ठरवला. लोकसभेनंतरची स्थिती पाहता आणि लोकांचा कामांसाठी दबाव आहे. त्यामुळे भाजपबरोबर जाणे संयुक्तिक होईल. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकारही सत्तेवर येण्याची शक्यता दिसत नसल्यामुळे मी राजीनामा दिल्याची प्रतिक्रिया शिवेंद्रसिंह राजे यांनी राजीनाम्यानंतर दिली. 

१९६२ पासून आमदार असलेले गणपतराव देशमुख यंदा निवडणूक लढणार नाहीत

शिवेंद्रसिंह राजे म्हणाले की, मतदारसंघात काम करण्याचा जनतेचा दबाव असतो. मतदारसंघातील प्रश्न सुटले पाहिजेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येण्याचीही शक्यता नाही. मी कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच निर्णय घेतला. सध्याची परिस्थिती पाहता भाजपमध्ये जाणे संयुक्तिक होईल. त्यामुळे मी राजीनामा दिलेला आहे.

माझी कोणाबद्दल नाराजी नाही. मला शरद पवार यांचा आदर आहे. अजित पवार यांनीही नेहमी साथ दिली. बंधू म्हणून उदयनराजेंचे आम्हाला नेहमीच सहकार्य मिळेल. 

नवी मुंबईतील नगरसेवकही घड्याळ काढून भाजपचा झेंडा हाती घेणार

शरद पवारसाहेबांच्या शब्दाखातर मी लोकसभेचे काम केले. माझ्या मतदारसंघातून उदयनराजे यांना ४२ हजारांचे मताधिक्य मिळवून दिले. मी पक्षाशी गद्दारी केलेली नाही, हे सांगण्यास ते विसरले नाही.

भाजपत प्रवेश करण्याआधी मी त्यांच्याकडे काहीही मागितलेले नाही. मतदारसंघ हा माझ्यासाठी प्राधान्याचा विषय आहे. त्यांच्या कामासाठीच मी भाजपत प्रवेश करणार आहे. काम करण्याचा हाच उमेदीचा काळ आहे, असेही ते म्हणाले. 

'अखेरच्या श्वासापर्यंत पवारसाहेबांना सोडून जाणार नाही'