राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पावसामुळे नुकसान झालेल्या भागांच्या पाहणी दौऱ्यावर होते. मात्र, हा दौरा अचानक थांबवत ते शनिवारी मुंबईमध्ये दाखल झाले. पवार हे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, शरद पवार यांनी मुंबई येथील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक बोलावली. या बैठकीला जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली. या बैठकीमध्ये राज्यातल्या सध्याच्या घडामोडींवर चर्चा झाली.
अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना १० हजार कोटींची तातडीची मदत
सध्या राज्यात भाजप आणि शिवसेनेत सरकार स्थापनेवरुन वाद सुरु आहे. अशातच शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची भेट घेण्यापूर्वी मुंबईत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावली. शरद पवार सोमवारी ४ नोव्हेंबर रोजी सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेणार होते. मात्र ते रविवारीच दिल्ला जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले आहे. या भेटी दरम्यान, शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
मला पाकिस्तानला जाऊ द्या, नवज्योतसिंग सिद्धूंची विनंती
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसचा अप्रत्यक्ष पाठिंबा मिळवून शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करु शकते. तर शिवसेनेच्या प्लॅन बी नुसार छोटे पक्ष आणि अपक्षांना ते सोबत घेऊन जाऊ शकतात. काँग्रेस थेट सरकारचा भाग होणार नाही. कारण काँग्रेस नेतृत्व याच्या बऱ्या-वाईट परिणामांचा विचार करत आहे. तर काँग्रेसच्या काही नेत्यांना वाटते की, शिवसेनेने पुढाकार घ्यावा. गुरुवारी संध्याकाळी शरद पवार यांच्या निवासस्थानी बोलावलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत या योजनेवर चर्चा झाली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी दक्षिण मुंबईतील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसप्रमुखाची भेट घेतल्यानंतर ही बैठक बोलविण्यात आली होती.
रजनीकांत यांना सरकार आयकॉन अवॉर्डने सन्मानित करणार
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर गेल्या ३० वर्षांपासून युती असलेल्या भाजप आणि शिवसेनेमध्ये तणाव निर्माण झाला आहे. शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली. यामध्ये भाजपने १०५ जागांवर विजय मिळवला तर शिवसेनेने ५६ जागांवर विजय मिळवला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला ५४ जागांवर तर काँग्रेसला ४४ जागांवर विजय मिळाला आहे. तर सत्ता स्थापनेसाठी १४५ जागांची आवश्यकता आहे.
टिकटॉकच्या निर्माता कंपनीने आणला नवा स्मार्टफोन, पाहा फिचर्स