पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शरद पवार दुपारी ईडी कार्यालयात जाणार; दक्षिण मुंबईत जमावबंदी लागू

शरद पवार

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज ईडी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. याप्रकरणी ईडीने शरद पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ईडीकडून कोणतीही नोटीस पाठवण्यात आली नसताना देखील शरद पवार आज दुपारी २ वाजता ईडी कार्यालयात जाणार आहेत. त्यामुळे ईडी कार्यालय परिसरासह दक्षिण मुंबईतील कफ परेड, मरिन ड्राईव्ह, आझाद मैदान, डोंगरी, जे. जे मार्ग, एम आर ए मार्ग पोलिस स्टेशन परिसरामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

 

'माफ करा साहेब! यावेळी तुमचे ऐकणार नाही'

शरद पवार यांच्याविरोधात ईडीने गुन्हा दाखल केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. संपूर्ण राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी ईडीच्या कार्यालय परिसरात गर्दी करु नका.  ईडी कार्यालयाच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये. तसेच तिथे शांतता राखावी, असे ट्विट करत त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. 

पुण्यातील ५ तालुक्यात शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

दरम्यान, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना क्लीन चीट दिली आहे. 'मी दिलेल्या पुराव्यांमध्ये शरद पवार यांचे नाव कसे आले हे मला माहित नाही. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कारवाई केली जावी', अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली. तसंच, दोषींवर कारवाई झाली पाहिजे. मात्र जे दोषी नाहीत त्यांना याप्रकरणात अडकवू नये, असे देखील अण्णांनी सांगितले. 

'दलित समाजातील मुलांची हत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ncp leader sharad pawar visit ed office today section 144 imposed near ed office primises