पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'भाजपच्या पराभवाची मालिका आता थांबणार नाही'

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

'दिल्लीमध्ये भाजपच्या अहंकाराचा पराभव झाला. भाजपच्या पराभवाची मालिका सुरु झाली असून ती आता थांबणार नाही, अशी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजवर निशाणा साधला आहे. दिल्ली विधानसभा निवडणूक निकालासंदर्भात माध्यमांशी बोलताना शरद पवारांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. यावेळी शरद पवार यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले. 

 

'केजरीवालांच्या तोडीस तोड उमेदवार देण्यास आम्ही कमी पडलो'

शरद पवार यांनी पुढे असे सांगितले की, दिल्लीच्या निकालावर आश्चर्य वाटले नाही. आपचा विजय होईल, असा कौल होता. तर, भाजपचा धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न दिल्लीत फसला, असल्याची टीका शरद पवारांनी केली. तसंच, 'दिल्ली हे देशातील एक वेगळे शहर आहे. तिथे अनेक राज्यांतील लोकं राहतात. त्यामुळे दिल्लीच्या निवडणुकीचा निकाल हा दिल्लीपुरता मर्यादित नाही. सध्या देशात बदलाचं वातावरण आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. 

'भारताचा आत्मा वाचवल्याबद्दल दिल्लीवासीयांचे आभार'