पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्याची काय पूर्ण देशाचीच निवडणूक घ्या; पवारांचे फडणवीसांना आव्हान

शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'हिम्मत असेल तर त्यांनी पुन्हा निवडणूक घेऊन दाखवावीच', असे आव्हान देणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'फक्त राज्याची काय पूर्ण देशाचीच निवडणूक घ्या. आमची काहीच हरकत नाही.', असा टोला शरद पवारांनी लगावला आहे. मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

हिम्मत असेल तर पुन्हा निवडणूक लावा, फडणवीसांचे ठाकरेंना आव्हान

मुक्ताईनगर येथे बोलताना ‘हिम्मत असेल तर, आमचं सरकार पाडून दाखवा’ असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की, ‘सरकार पाडण्याची आम्हाला गरज नाही. ते तसेही पडेल. पण हिम्मत असेल तर पुन्हा जनतेच्या कोर्टात जाऊ. पुन्हा निवडणूक घेऊन दाखवावीच', असे फडणवीस म्हणाले होते.

'एल्गार परिषदेबाबत केंद्राने एवढी तत्परता का दाखवली?'

दरम्यान, शिवेसना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार फारकाळ टिकणार नाही. त्यांच्यामध्ये समन्वय नाही असे म्हणणाऱ्यांना देखील पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत पूर्ण समन्वय आहे. समान कार्यक्रमावर आम्ही काम करत आहोत, असे पवारांनी सांगितले. 

भीमा-कोरेगावचा तपास केंद्राला दिलेला नाही, उद्धव ठाकरेंचा खुलासा