पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजपचे काही नेते आमच्या संपर्कात: नवाब मलिक

नवाब मलिक

भाजपचे काही नेते आणि राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेले काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, नवाब मलिक यांनी गोपीनाथ गडावरील मेळाव्या दरम्यान भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या भाषणावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.  

जपानच्या पंतप्रधानांचा नियोजित भारत दौरा पुढे ढकलला

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. भाजप हा शेटजी-भजटींचा पक्ष होता. त्याला आम्ही बदलले, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले होते. यावर प्रतिक्रिया देतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवाब मलिक यांनी सांगितले की, 'आजच्या घडीला सुध्दा भाजप त्याच पध्दतीने चालत आहे. याचा अर्थ पंकजा मुंडे यांच्या निशाण्यावर कुठे तरी अमित शहा आणि फडणवीस होते. त्यामुळे भाजपमध्ये कुठेतरी खदखद सुरु असल्याचे दिसत आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले. 

धीर धरा, शबरीमला प्रकरणात सुप्रीम कोर्टाची महिला आंदोलकांना

दरम्यान, गोपीनाथ गडावरील मेळाव्या दरम्यान पंकजा मुंडे यांनी केलेल्या भाषणानंतर भाजपमध्ये अस्वस्थता पहायला मिळत आहे. पराभव वैगेरे चिल्लर गोष्टीनं खचणार नाही, मात्र गेल्या काही दिवसांत १५ वर्षांच्या राजकीय प्रवासातील वाईट अनुभव आला. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही, असे सांगत पंकजा मुंडे यांनी सांगितले होते. पंकजा मुंडे यांनी कोअर कमिटीतून मुक्त होण्याची घोषणा केली असली तरी पक्षात कायम राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

राहुल गांधींच्या 'रेप इन इंडिया' कमेंटवरून संसदेत गदारोळ, भाजप