पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार: नवाब मलिक

नवाब मलिक

मुख्यमंत्री पदासाठी आग्रही असलेल्या शिवसेनेची मुख्यमंत्री पदाची स्वप्न पूर्ण होणार असल्याचे चित्र पहयला मिळत आहे. मुंख्यमंत्री पदावरुनच शिवसेना आणि भाजपमधील युती तुटली होती. हिच शिवसेना आता काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या तयारीमध्ये आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केले आहे. तसंच, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते उद्या राज्यपालांची भेट घेणार असल्याचे देखील नवाब मलिक यांनी सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री पदाची शिवसेनेची इच्छा पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

क्रिकेट खेळत नाही पण त्याचे नियोजन करतो, शरद पवारांचे उत्तर

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सरकार स्थापनेबाबत चर्चावर चर्चा सुरु आहेत. अशामध्ये मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावर नवाब मलिक यांनी अखेर मौन सोडले.  नवाब मलिक यांनी सांगितले की, 'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आहे. याच मुख्यमंत्री पदावरुनच शिवसेना आणि भाजपमध्ये वाद झाला होता. शिवसेनेला अपमानित केले गेले. त्यामुळे त्यांचा स्वाभिमान आणि सन्मान राखणे आमची जबाबदारी आहे.' असे सांगत मुख्यमंत्री सेनेचाच होणार असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

'मोदी, शहांना समजण्यासाठी संजय राऊतांना अनेक जन्म

दरम्यान,  शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांची आघाडी महाराष्ट्रात लवकरच सत्तेत येईल हे चित्र निर्माण झाले आहे. या तिन्ही पक्षांनी आपल्या सरकारसाठी किमान समान कार्यक्रम निश्चित केला असून, मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचाच नेता विराजमान होईल, हे सुद्धा निश्चित झाले आहे. पण याबद्दल अधिकृत घोषणा झालेली नाही. तिन्ही पक्षांचे श्रेष्ठीच यावर अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे. 

नुकसानग्रस्त शेतीचे सरसकट पंचनामे करा: शरद पवार